Ladki Bahin ekyc Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या किंवा लाभाची प्रतीक्षा करत असलेल्या पात्र महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. e-KYC प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अनेकांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्तीची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
🔎 e-KYC दुरुस्तीची गरज का पडली?
अनेक पात्र लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, काही तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांना अजूनही लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये आर्थिक लाभ मिळालेला नाही. या समस्यांचा विचार करून सरकारने लाभार्थ्यांना पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी दिली आहे.
📅 e-KYC दुरुस्तीची अंतिम मुदत
- शेवटची तारीख: ३१ मार्च २०२६
- दुरुस्तीची पद्धत: ऑनलाइन पोर्टलद्वारे
- Ladki Bahin ekyc Maharashtra : मुदतीपूर्वी दुरुस्ती केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल.
📝 कोणाला e-KYC दुरुस्ती करणे आवश्यक?
- e-KYC पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या महिला
- चुकीची माहिती भरलेली किंवा चुकीचा पर्याय निवडलेले लाभार्थी
- योजनेत पात्र असूनही अर्ज प्रलंबित असलेले अर्जदार महिला
💻 e-KYC दुरुस्ती कशी करावी? (Step-by-Step Process)
- लाडक्या बहीण योजनेच्या ऑनलाइन पोर्टलला भेट द्या. : ladakibahin.maharashtra.gov.in
- “हि eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्या कडून eKYC करतांना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते” या बटन वर क्लिक करा
- e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हे वेबपेज ओपन होईल त्यामध्ये “लाभार्थी आधार क्रमांक” टाका.
- कॅप्चा* भरा आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती “मी सहमत आहे यावर ऑप्शन वर क्लिक करून
- “ओटीपी पाठवा” हे बटन दाबा आधार सोबत लिंक असेलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो भरा.
- आता तुम्हाला दोन प्रश्न विचारण्यात येईल : १) माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी संस्थेत कार्यरत आहे का? आणि २) माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवा निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन घेत आहे का ? या प्रश्नाचे उत्तर नाही असे सिलेक्ट करा किंवा घरातील सदस्य सरकारी नोकरी ला असेल किंवा पेन्शन मिळत असेल तर आहे असे सिलेक्ट करा.
- वरील प्रश्नांचे उत्तर दिल्या नंतर “सबमिट करा” या वर क्लिक करा.
- दुरुस्ती सबमिट करून अर्जाची पुष्टी करा.
Ladki Bahin ekyc Maharashtra : अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC दुरुस्ती तुम्ही करू शकता.
Ladki Bahin Kyc Durusti Kashi Karavi (Video)
लाडकी बहीण ekyc दुरुस्ती कशी करावी ? या विषयावर सविस्तर माहिती खालील व्हिडिओ मध्ये आहे.
⚠️ महत्त्वाच्या सूचना
- दुरुस्ती करताना आधार व वैयक्तिक माहिती अचूक भरा.
- अंतिम मुदतीनंतर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध नसेल.
- ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलचाच वापर करा.
📢 निष्कर्ष
Ladki Bahin ekyc Maharashtra : महिला व बालविकास विभागाची भूमिका स्पष्ट आहे — प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत चूक झाली आहे, त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी दुरुस्ती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
✅ अधिकृत माहिती कुठे उपलब्ध आहे?
- अधिकृत स्रोत: महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची X पोस्ट
- विभाग: महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग
- अधिकृत पोर्टल: https://ladakibahin.maharashtra.gov.in/